🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या सारिका शहा यांना 'स्टार गोल्डन बेस्ट प्रेसिडेंट' पुरस्कार; क्लबच्या उल्लेखनीय कार्याचाही जिल्हास्तरीय गौरव

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड


इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या अध्यक्षा सारिका शहा यांनी वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा 'स्टार गोल्डन बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात डिस्ट्रिक्ट चेअरमन आशा देशपांडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
क्लबने वर्षभर राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे यंदाच्या उत्कृष्ट कार्याची जिल्हास्तरावर विशेष दखल घेण्यात आली. युवा विकास, पर्यावरण संरक्षण, बाल हक्क, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक सेवा, कुटुंब कल्याण आणि इनरव्हील ब्रॅण्डिंग या विविध सेवा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्लबला तीन उत्कृष्टता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
याशिवाय, क्लबच्या महत्त्वाकांक्षी 'हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट' ला विशेष पदक मिळाले. क्लबच्या संपादिका अंजना माने यांना त्यांच्या प्रभावी कार्याबद्दल 'स्टार क्लब एडिटर अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले. तसेच क्लबच्या सर्वांगीण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत 'इनक्रेडिबल वर्क' हा विशेष गौरवही क्लबला प्राप्त झाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अध्यक्षा सारिका शहा यांनी हा सन्मान क्लबच्या प्रत्येक सदस्याच्या निस्वार्थ सेवाभाव, समर्पण, एकजूट आणि सातत्यपूर्ण सहकार्याचे फलित असल्याची भावना व्यक्त केली. समाजहितासाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट छाया पवार, तरुणा मोहिरे, निमिषा गोर, मनीषा पाटील, हेमलता फुटाणे, विजयश्री मोहिते, शिवांजली पाटील, रतन शिंदे, वैशाली इंगोले, नंदा आवळकर, सुषमा तिवारी, सपना शहा, विद्या शहा आणि स्मिता शहा यांच्यासह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.


➖➖➖➖➖➖➖➖

#कराड #इनरव्हीलक्लबऑफकराडसंगम #सारिकाशहा

#कराडकर #socialwork #Karad #Changbhala

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर

#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या