🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

धक्कादायक ; फलटण तालुक्यातील खामगावमध्ये हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

 


चांगभलं प्रतिनिधी | फलटण

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव (साखरवाडी) येथे बुधवारी (८ जुलै) सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागून पारधी समाजातील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर अक्षरशः काळाने घाला घातला. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने प्रथम सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नी गंगू सतीश शिंदे (वय ४०) यांनी धाव घेतली. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला.

यानंतर आई-वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती सतीश शिंदे (वय २४) हेही पुढे सरसावले. दुर्दैवाने त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि चारही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

या हृदयद्रावक घटनेमुळे खामगाव व साखरवाडी परिसरात शोककळा पसरली असून पारधी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतांची नावे :
सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८)
गंगू सतीश शिंदे (वय ४०)
सचिन सतीश शिंदे (वय २६)
आरती सतीश शिंदे (वय २४)
सर्व रा. साखरवाडी, खामगाव, ता. फलटण, जि. सातारा.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला असून, या दुर्घटनेचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात विजेचा धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले असून अधिकृत तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


➖➖➖➖➖➖➖

#फलटणक्राईमन्यूज #विजेच्याधक्क्यानेचौघांचामृत्यू #खामगाव 

#साखरवाडी #फासेपारधी #चांगभलं #चांगभलंन्यूजपेपर

#चांगभलंन्यूज #साताराजिल्हा #पोलीसन्यूज #क्राईमन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या