🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

स्व. आनंदरावजी चव्हाण, स्व. प्रेमलाताई चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगर येथे अभिवादन; वृक्षारोपण व प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न



हैबत आडके |चांगभलं प्रतिनिधी कराड

स्वर्गीय आनंदरावजी चव्हाण (काका), स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण (काकी) आणि स्वर्गीय रामचंद्र पाटील (दादा) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगर येथील प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालयात बुधवारी, दि. ८ जुलै २०२६ रोजी भावपूर्ण स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तिन्ही दिवंगत मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वर्गीय आनंदरावजी चव्हाण, स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण आणि स्वर्गीय रामचंद्र पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या थोर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत आपल्या मनोगतातून त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय आनंदरावजी चव्हाण आणि स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण यांच्या समाजाभिमुख कार्याचा, त्यांनी जपलेल्या संस्कारांचा तसेच प्रेरणादायी जीवनप्रवासाचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी मलकापूरचे युवा उद्योजक श्री. रफिकशेठ इनामदार, उद्योजक श्री. आर. टी. स्वामी, विजयनगरच्या सरपंच सौ. अनिताताई संकपाळ, मुंढे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, मा. सरपंच रमेश लवटे, विजयराव कदम, राजेंद्र कदम, माजी उपसरपंच विश्वासराव पाटील, प्रा. हनमंतराव कराळे, मुंढे गावचे अशोकराव जमाले, विजयनगरचे माजी सरपंच संजय शीलवंत, युवा नेते प्रतापसिंह पाटील, गिरीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव, सौ. रंजना जाधव, रामचंद्र जाधव, हिम्मतराव देसाई, विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी विजयनगरचे उपसरपंच मानसिंगराव पाटील (दादा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमानंतर विद्यालय परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
या स्मृतिदिन कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖

Keywords:
आनंदराव चव्हाण स्मृतिदिन
प्रेमलाताई चव्हाण स्मृतिदिन
रामचंद्र पाटील स्मृतिदिन
विजयनगर प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालय
कराड बातमी
विजयनगर स्मृतिदिन कार्यक्रम
वृक्षारोपण कार्यक्रम कराड
मानसिंगराव पाटील
Changbhala News Karad
Hashtags :
#Karad #Vijaynagar #AnandraoChavan #PremalataiChavan #RamchandraPatil #Smrutidin #Tribute #TreePlantation #SataraNews #KaradNews #Malkapur #ChangbhalaNews #MaharashtraNews #Education #SocialWork #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या