🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा साखर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

शिवनगर (रेठरे बुद्रुक), ता. कराड येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक मराठी शाळेेच्या समोरील प्रांगणात होणार आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे, अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.

सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच गेल्या हंगामातील प्रगतीचा आढावा मांडला जाणार आहे. सभेला कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सभेस येताना सभासदांनी प्रवेशपत्रिका, ओळखपत्र/स्मार्टकार्ड आणणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासदांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी केले आहे.


➖➖➖➖➖➖➖

#सुरेशबाबाभोसले #कृष्णासाखरकारखाना #रेठरेबुद्रुक #कृष्णासर्वसाधारणसभा2026 #शिवनगर #चांगभलंन्यूजपेपर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या