🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरु ; आ. डॉ अतुलबाबा भोसले

 कृष्णा सहकारी बँकेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात




हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड


कृष्णा सहकारी बँकेने ५५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, आगामी काळात बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कृष्णा सहकारी बँकेच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

आटके टप्पा (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सभेचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावर कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, संचालक अरविंद पाटील, सुनील पाटील, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत कापसे, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

 



याप्रसंगी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सातत्याने सुधारणा होत असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय २००० कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १८.०९ असून, येत्या काळात ते २० टक्क्यांच्या पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

कृष्णा बँकेच्या पुढील पाच वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. बँकेचा व्यवसाय वाढवून आवश्यक निकष पूर्ण केल्यानंतर, रिझर्व्ह बँकेकडे शेड्युल्ड बँकेच्या दर्जासाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यानंतर बँकेचा मल्टीस्टेट स्तरावर विस्तार करण्याचेही उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. तसेच लवकरच पंढरपूर, चिपळूण, नवी मुंबई आणि आष्टा याठिकाणी बँकेच्या नव्या ४ शाखा सुरु करण्यात येणार आहेत. ग्राहकांना घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळाव्यात, यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण आखले असून, बँकेच्या मोबाइल अॅपमध्येही आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा बँकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत ठेवण्यासाठी ठेवी, कर्जवाटप, भांडवल आणि एनपीए या सर्व बाबींचा काटेकोर समतोल राखणे आवश्यक आहे. बँकेने भविष्यातही शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मिती यांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करावी. तसेच बदलत्या बाजारपेठेचा, ग्राहकांच्या गरजांचा आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास करुन, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून ग्राहकांना अधिक सुलभ सेवा द्याव्यात.

याप्रसंगी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी बँकेचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. सभेला बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, प्रदीप पाटील, दिलीपराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दामाजी मोरे यांनी स्वागत केले. शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले.



सभासदांना १२ टक्के लाभांश

कृष्णा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर लाभांशाची रक्कम वर्ग करण्यात आली.


कृष्णा बँकेचे नवे मुख्यालय लवकरच मलकापुरात उभारणार

कृष्णा बँकेच्या भविष्यातील विस्तारासाठी मोठ्या आणि आधुनिक मुख्यालयाची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मलकापूर येथे जागा निश्चिती करण्यात आली असून, या नव्या संकुलात मोठा सभागृह तसेच बँकेच्या पुरस्कारांची माहिती देणारे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे. ही नवी इमारत बँकेच्या सभासदांना आणि ग्राहकांना अभिमान वाटेल, अशा पद्धतीची उभारण्याचा मानस असल्याचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले.


➖➖➖➖➖➖

#कृष्णासहकारीबँक #अतुलबाबाभोसले #चांगभलंन्यूजपेपर #कृष्णाबँकवार्षिकसभा2026 #चांगभलं #कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या