🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

...अन् दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर फुललं समाधानाच हास्य !

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण



हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कुणाच्या पायाला जन्मापासून व्यंग.. तर कुणाला अपघातानं आलेलं अंधत्व.. यांच्याच जोडीला वार्धक्यामुळं चालता न येणारे, ऐकू न येणारे अनेक ज्येष्ठ नागरिक.. पण आज या सर्व दिव्यांग बांधवांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हास्य फुललेलं पाहायला मिळालं.. निमित्त होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून, झालेल्या सहाय्यक उपकरणांच्या मोफत वितरण कार्यक्रमाचं!

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचवड फाटा (ता. कराड) येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग योजनेंतर्गत आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व ‘अल्मिको’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते ९२१ पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ८०.७८ लाख रुपयांचे विविध सहाय्यभूत साहित्य वितरित करण्यात आले.

 



याप्रसंगी व्यासपीठावर कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, सदस्य पै. धनंजय पाटील, दादासाहेब मरगळे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, जन्मतः किंवा आयुष्यातील एखाद्या घटनेमुळे दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींच्या मनात अनेकदा नैराश्य निर्माण होते. अशा व्यक्तींमध्ये धैर्य व आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजात इतरांप्रमाणे ताठ मानेने जगता यावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आम्ही कराड तालुका, जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यांमधील दिव्यांग बांधवांची माहिती संकलित केली असून, सुमारे १८०० दिव्यांग बांधवांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९२१ जणांना या पहिल्या टप्प्यात साहित्य देण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांनाही या योजनेतून सहाय्य मिळवून देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.

 



यावेळी कराडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, सहाय्यक उपकरणांमुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे इतरांवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांच्या आत्मसन्मानाला बळ मिळण्यास मदत होणार असल्याच मत व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी कृष्णा रुग्णालयातील आपत्कालीन सेवेचे व तेथील सर्व वैद्यकीय टीमचेही कौतुक केले.

यावेळी सभापती नंदाताई यादव व अल्मिको संस्थेच्या अभिलाषा ढोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करुन, सहपयोगी साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व शासनाचे आभार मानले.

 



रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सागर पवार यांनी प्रास्तविक केले. पै. धनंजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गौरीश साळुंखे, डॉ. श्रुषा कांबळे, डॉ. सुशिवा सिंग, सुनील थोरात यांच्यासह दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्याचा मानस...

ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा समाजाला मोठा फायदा होतो. या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

➖➖➖➖➖

#अतुलबाबाभोसले  #कराडदक्षिण #दिव्यांगानामोफतउपकरणेवाटप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या