🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच होणार! नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची माहिती

 


चांगभलं प्रतिनिधी | कराड

कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा. श्री. तुकाराम मुंढे हे तरुणाईशी संवाद साधण्यासाठी कराडमध्ये येत आहेत. या व्याख्यानाला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार असून, अपेक्षित गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने कृष्णाबाई घाटावरील वाळवंटात व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू केले होते.
मात्र, राज्य शासनाने कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे हे व्याख्यान होणार आहे. उपस्थितांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात तसेच टाऊन हॉल परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरात स्क्रीन लावून नागरिकांना व्याख्यानाचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नागरिकांना शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्याचे आवाहन केले आहे. वाहनाने येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, पार्किंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्याख्यानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.


➖➖➖➖➖➖

#कराड #तुकाराममुंडे #शारदीयव्याख्यानमाला #कराडनगरपरिषद #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या