🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड नगरपालिका निवडणूक : दुसऱ्या दिवशी ५ उमेदवारांची माघार, उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

 

कराड नगरपालिका निवडणूक २०२५: ५ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले
संग्रहित छायाचित्र

प्रभागनिहाय माघार घेणारे उमेदवार

कराड , दि. २० नोव्हेंबर २०२५ | चांगभलं वृत्तसेवा

कराड नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून गुरुवारी (ता. २० नोव्हेंबर) पाच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या शुक्रवारी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार,
• प्रभाग २ ब : विनायक कदम (अपक्ष)
• प्रभाग ३ अ : वंदना देशमुख (अपक्ष)
• प्रभाग ६ अ : सपना ओसवाल (अपक्ष)
• प्रभाग ७ ब : अभिषेक बेडेकर (अपक्ष)
• प्रभाग १५ ब : श्रीधर फुटाणे (अपक्ष)

या पाच जणांनी आपले अर्ज कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडून मागे घेतले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर उपस्थित होते.

उद्या शुक्रवारी आणखी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल व निवडणूकीचे अंतिम चित्र अधिक स्पष्ट होईल.

मलकापुरात एका उमेदवाराची माघार....
दरम्यान , मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रभाग क्र.६ ब या प्रभागातील निवडणूकीतून अधिकराव वसंत बागल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या प्रभागामध्ये
१ शेवाळे सुरज शंकर
२ मुटल संदीप बबन
या दोन उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.

#कराडनगरपालिका #KaradNagarPalika #कराडनिवडणूक #KaradElection2025 #नगरपरिषदनिवडणूक #MaharashtraLocalBodyElection #KaradNews #सातारा #Satara #अपक्षउमेदवार #उमेदवारीमाघार #MaharashtraPolitics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या