हैबत आडके, कराड | दि. २१ नोव्हेंबर २०२५
कराड नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस पार पडताच निवडणूक रिंगणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ९ उमेदवार रिंगणात उभे असून या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या रिंगणात राहिलेले उमेदवार असे –
विनायक पावसकर (भाजप), झाकीर पठाण (काँग्रेस), इमरान मुल्ला (बसपा), राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी), गणेश कापसे (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष), शरद देव (अपक्ष), रणजीत पाटील (अपक्ष) व बापू लांडगे (अपक्ष).
नगरसेवक पदासाठीही यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार असून एकूण १०९ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. १५ प्रभागांमध्ये विविध पॅनेलमधील लढतींमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावले आहे.
असे आहे लढतींचे स्वरूप :-
एकास एक लढती : ४ ठिकाणी
तिरंगी लढती : ७ ठिकाणी
बहुरंगी लढती : ४ ठिकाणी
यामुळे अनेक प्रभागांमध्ये प्रचंड गाठी-भेटी, मतदारसंघातील समीकरणे, जाती-धर्माचे गणित तसेच प्रभागांतल्या वैयक्तिक प्रभावाची मोठी कसोटी लागणार आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही या वेळी ताकदीनिशी उडी घेतली असून निकालापर्यंत अनिश्चिततेचे सावट कायम राहणार आहेत.
शहराच्या भविष्यास आकार देणारी ही निवडणूक असल्याने नागरिकांच्याही नजरा या राजकीय लढतींकडे खिळून राहिल्या आहेत. विशेषत: काही प्रभागांत तर बहुरंगी लढतींमुळे ‘कोणाचे पारडे जड?’ हा प्रश्न सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
कराड नगरसेवक पदासाठी रिंगणात राहिलेले
प्रभागनिहाय १०९ उमेदवार यादी स्वरूपात असे:
प्रभाग १ अ - सुरेखा काटकर, रूपाली माने.
प्रभाग १ ब - संजय कांबळे, जयवंत पाटील, हूमेरा शेख,
प्रभाग २ अ - नीलम कदम, पद्मजा लाड, भाग्यश्री साळुंखे.
प्रभाग २ ब - समीर करमरकर, सुहास पवार.
प्रभाग ३ अ - रजिया आंबेकरी, कश्मिरा इंगवले, सारिका देशमुख, निकहत नदाफ, रजनी पवार.
प्रभाग ३ ब - प्रवीण पवार, संकेत पवार, रियाज मुजावर, सागर लादे, जावेद शेख, साहेबराव शेवाळे, दाऊद सय्यद.
प्रभाग ४ अ - शैला पाटील, स्वाती मोहिते, प्रियांका यादव.
प्रभाग ४ ब - अर्चना ढेकळे, शिवाजी रामूगडे, आनंद लादे.
प्रभाग ५ अ - अर्चना पाटील, अरुणा पाटील, रेवती बर्गे, मिनाज सुतार.
प्रभाग ५ ब - राजेंद्र कांबळे, राहुल भोसले, योगेश लादे, शुभम लादे.
प्रभाग ६ अ - वहिदा इनामदार, शारदा माने, सानिया मुतवल्ली, साजिदा मुल्ला.
प्रभाग ६ ब - राहील मुतवल्ली, सुनील व्हावळ, अल्ताफ शिकलगार.
प्रभाग ७ अ - प्रिया आलेकरी, अंजली कुंभार, वंदना गायकवाड, तेजश्री पाटसकर.
प्रभाग ७ ब - अजय कुलकर्णी, मन्सूर खैरतखान, अजय पावसकर, जयंत बेडेकर, विनायक मोहिते, विद्या मोरे.
प्रभाग ८ अ - देवयानी डुबल, किशोरी शिंदे, सुनीता साळुंखे.
प्रभाग ८ ब - संजय चन्ने, विजय वाटेगावकर,
प्रभाग ९ अ - मिनाज पटवेकर, शमीम बागवान,
प्रभाग ९ ब - आशुतोष जाधव, समीर पटवेकर, प्रताप साळुंखे.
प्रभाग १० अ - आशा मुळे, मनीषा मुळे.
प्रभाग १० ब - प्रताप इंगवले, मोहसीन कागदी, नागेश कुरले, सुमित जाधव, यशराज सुर्वे.
प्रभाग ११ अ - सुदर्शना थोरवडे, माया भोसले, शुभांगी भोसले, वैष्णवी वायदंडे.
प्रभाग ११ ब - पुनम धोतरे, गणेश पवार, अजित भोसले, योगेश वेल्हाळ, अक्षय सुर्वे.
प्रभाग १२ अ - तेजस्विनी कुंभार, स्मिता धोत्रे, अनिता पवार, रुकैया मुलानी.
प्रभाग १२ ब - गणेश कापसे, वीरेंद्र गुजर, श्रीकांत घोडके, विजय यादव, शाहरुख शिकलगार, जय सूर्यवंशी.
प्रभाग १३ अ - कीर्तीका गाढवे, स्मिता हुलवान.
प्रभाग १३ ब - आशुतोष डूबल, सिद्धांत पाटील, अमरजीत राजापुरे, राकेश शाह.
प्रभाग १४ अ - प्रियांका भोंगाळे, वर्षा वास्के.
प्रभाग १४ ब - शिवाजी पवार, इंद्रजीत भोपते, किरण सूर्यवंशी.
प्रभाग १५ अ - दया गायकवाड, पुनम घेवदे, योगिता जगताप.
प्रभाग १५ ब - अख्तरहुसेन आंबेकरी, नईम पठाण, विश्वनाथ फुटाणे.
प्रभाग १५ क - सुप्रिया खराडे, हसीना मुल्ला, संगीता शिंदे.
#कराडनिवडणूक2025 #कराडनगरपालिका #राजकारण #कराडराजकारण #नगरसेवकमुंबई #निवडणूकचुरस #चांगभलंन्यूज #KaradElection #KaradNews
#KaradMunicipalElection #KaradPolitics #MaharashtraElections #LocalPolls #PoliticalNews #Election2025

0 टिप्पण्या