कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया आज चौथ्या दिवशी अलोट गर्दीत पार पडली. जिल्हा परिषद गटासाठी आजअखेर ३६ तर पंचायत समिती गणासाठी ४३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते.
आज मंगळवार दि. २० रोजी -
पाल जि. प. गटातून प्रकाश वसंतराव साळुंखे यांनी भाजपाकडून.
उंब्रज जि. प. गटातून महादेव दिनकर साळुंखे भाजपा व अपक्ष, सुनील प्रकाश पाटील शिवसेना उबाठा, संजय प्रकाश पाटील भाजपा, संग्राम अधिकराव पवार अपक्ष.
मसूर जि. प. गटातून प्रमोद शिवाजी जाधव भाजपा व अपक्ष, लालासो विष्णुपंत जगदाळे भाजपा, मानसिंगराव वसंतराव जगदाळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, शहाजीराव जयवंतराव जगदाळे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट.
कोपर्डे हवेली जि. प. गटातून नीलम हिंदुराव पिसाळ अपक्ष, विद्या रामकृष्ण वेताळ भाजपा व अपक्ष, सारिका संतोष वेताळ भाजपा व अपक्ष.
सैदापूर जि. प. गटातून बाळासाहेब पांडुरंग बागडे भाजपा, पराग शंकर रामुगडे भाजपा व अपक्ष.
वारुंजी जि. प. गटातून दिपाली प्रमोद पाटील भाजपा.
कार्वे जि. प. गटातून शुभांगी संतोष पाटील नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, शुभांगी संतोष पाटील अपक्ष, रंजना सुहास जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
रेठरे बुद्रुक जि. प. गटातून सुनिता बापूसाहेब साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस, सुचिता नितीन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
काले जि. प. गटातून माधुरी प्रशांत पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस, स्वप्नाली राजेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस.
येळगाव जि. प. गटातून तानाजी भगवान चवरे भाजपा, तांबवे व विंग जि.प.गटातून अद्यापपर्यंत एकही अर्ज आज दाखल झाला नाही.
पंचायत समिती गणांसाठी आज
पाल पं. स. गणातून रणजीत विनायकराव पाटील भाजपा, प्रमोद तानाजीराव कदम भाजपा.
चरेगाव पं.स. गणातून दिपाली अमोल देशमाने भाजपा,
तळबीड पं. स गणातून महादेव दिनकर साळुंखे भाजपा व अपक्ष, संग्राम अधिकराव पवार अपक्ष, बाळासाहेब भार्गव पवार अपक्ष,
वडोली भिकेश्वर पं. स गणातून सौ. अंजली प्रमोद जाधव भाजपा, प्रियांका प्रशांत पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उर्मिला संतोष जाधव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी,
मसूर पं. स. गणातून संजय शंकर घोलप नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, विजय मारुती साळुंखे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, प्रशांत मारुती घोलप भाजपा, संतोष शंकर पाटील भाजपा,
वाघेरी पं. स गणातून नीलम हिंदुराव पिसाळ भाजपा व अपक्ष, शोभा जयसिंग डांगे भाजपा, स्वागती बाळासाहेब पोळ भाजपा, श्रद्धा संग्राम पिसाळ भाजपा, सीमा चंद्रकांत घारगे भाजपा,
कोपर्डे हवेली पं. स. गणातून सोपान एकनाथ चव्हाण भाजपा व अपक्ष, दत्तात्रय तात्या शेलार भाजपा,
वारुंजी पं. स. गणातून रवींद्र सर्जेराव बडेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, माधुरी रवींद्र बडेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,
कोयना वसाहत पं. स. गणातून नरेंद्र धोंडीराम नांगरे- पाटील भाजपा,
सुपने पं. स. गणातून स्नेहलता प्रशांत पाटील भाजपा,
विंग पं. स. गणातून अर्चना रमेश खबाले अपक्ष, वर्षा दादासो होगले अपक्ष,
गोळेश्वर पं. स. गणातून वैभव सुरेश यादव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,
शेरे पं. स. गणातून वर्षा शंकर निकम भाजपा, संगीता शंकरराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
रेठरे बुद्रुक पं. स. गणातून धनंजय तुकाराम पाटील भाजपा, दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अभिजीत शंकर सोमदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
काले पं. स. गणातून अमित शांताराम कुंभार राष्ट्रवादी काँग्रेस, नानासाहेब शामराव पाटील अपक्ष,
कालवडे पंचायत समिती गणातून स्वाती मानसिंगराव थोरात राष्ट्रवादी काँग्रेस,
सवादे पं. स. गणातून धनाजी शामराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, विलास ज्ञानदेव थोरात अपक्ष,
यांचे अर्ज दाखल झाले. असून उंब्रज, हजारमाची, सैदापूर, तांबवे, कोळे, कार्वे, येळगाव पंचायत समिती गणातून अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल नाही.
निवडणूक कक्षातून महसूल सहाय्यक प्रवीण साळुंखे व प्रवीण तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात कालपर्यंत ६५२ तर आज मंगळवारी २५४ अर्जाची मागणी झाली. तर आजअखेर एकूण ९०६ अर्ज उमेदवारांनी घेतले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ZillaParishadElection #PanchayatSamitiElection #KaradPolitics #SataraZPElection #कराडतालुका #जिल्हापरिषदनिवडणूक #पंचायतसमितीनिवडणूक #NominationFiling #Election2026 #LocalBodyElection #ChangbhalaNews #PoliticalUpdate

0 टिप्पण्या