🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

उंडाळे विभागात भाजपकडून दमदार उमेदवाराची मागणी; सवादे गणासाठी पंकज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा

 

उंडाळे विभागातील सवादे गणासाठी भाजपचे संभाव्य उमेदवार पंकज पाटील, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या समवेत

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


उंडाळे विभागातील येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समितीच्या सवादे गणासाठी साळशिरंबे येथील भाजपचे तडफदार कार्यकर्ते पंकज पाटील यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी या विभागातील पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.


पंकज पाटील यांच्या उमेदवारीमुळे उंडाळे विभागात भाजपला अपेक्षित यश मिळवणे अधिक सुलभ होऊ शकते, अशा राजकीय चर्चा सध्या रंगल्या आहेत. मात्र या संदर्भात पक्ष नेतृत्व आणि पक्ष संघटना कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंकज पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. उंडाळे , सवादे विभागात सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गोरगरीब व गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.


कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पंकज पाटील यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जिल्हा परिषद शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, बैलगाडी शर्यती, क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम सवादे व साळशिरंबे परिसरात राबवले आहेत.


पंकज पाटील यांनी २००७ साली तत्कालीन जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कराड दक्षिण युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारत सदस्य नोंदणी अभियानातून उंडाळे विभागात तरुण कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली.


त्यांच्या प्रयत्नातून २००९ साली साळशिरंबे गावात भाजप शाखेचे उद्घाटन तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील व आमदार कांताताई नलवडे यांच्या हस्ते झाले.
२०११ मध्ये त्यांची भाजपा युवा मोर्चा कराड तालुका अध्यक्षपदी निवड झाली, तर २०१४ मध्ये आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सध्या ते भाजप सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थी, महिला, शेतकरी, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी २४ तास कार्यरत राहणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. संवेदनशीलता, नेतृत्व कौशल्य आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे सवादे गणातील प्रश्न व समस्या त्यांना जवळून माहित आहेत.


त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास सवादे गणाचा सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास साधता येईल, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत.
एकूणच, एका दमदार, अनुभवी आणि जनतेत रुजलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी उंडाळे विभागातून जोर धरत असून, पंकज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास या गणात मोठी राजकीय चुरस पाहायला मिळेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#उंडाळेविभाग #येळगावZP #सवादेगण #पंकजपाटील #BJP #भाजप #सातारा_राजकारण
#कराडदक्षिण #अतुलबाबाभोसले #पंचायतसमिती #जिल्हापरिषद #स्थानिकनिवडणूक
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या