🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कासेगावात लोकनेते राजारामबापू पाटील यांचा ४२ वा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

कासेगाव येथील आझाद विद्यालयात लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पुतळ्याचे पूजन करताना मान्यवर व विद्यार्थी


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

आझाद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कासेगाव तसेच पुतळामाता विद्यालय कासेगाव येथे लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांची ४२ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उद्योजक संजीव पाटील यांच्या शुभहस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या गीत मंचातील विद्यार्थिनींनी ‘हे पदयात्री’ हे बापूंच्या कार्यावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कासेगाव शिक्षण संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या आर.टी.एस. परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
ज्युनिअर विभागाच्या प्राध्यापिका माधुरी पाटील यांनी आपल्या मनोगतात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.
या कार्यक्रमास कासेगावच्या लोकनियुक्त सरपंच कल्पनाताई गावडे, माजी सरपंच किरण पाटील, उपसरपंच सुजित पाटील, ,शहाजी माळी,दाजी गावडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पवार, पुतळामाता कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. पाटील, तसेच एम. जे. पाटील, ए. जे. माळी, कार्याध्यक्षा एस. एन. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. पी. जाधव यांनी केले तर आभार आर. एस. पांढरबळे यांनी मानले.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#RajaramBapuPatil #लोकनेतेराजारामबापू
#RajaramBapuSmrutiDin #KasegaonNews
#SataraNews #ChangbhalaNews
#शैक्षणिकवारसा #SocialReformer
#EducationAndValues #StudentAchievement
#MaharashtraLeaders

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या