🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

काले-किरपे अंतर्गत रस्त्यांसाठी ८० लाखांचा निधी मंजूर; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

कराड दक्षिण मतदारसंघातील काले व किरपे गावातील रस्ते विकासासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंत्री जयकुमार गोरे व भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने मंजूर.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड दक्षिण मतदारसंघातील काले आणि किरपे गावातील अंतर्गत रस्ते सुधारणा कामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे एकूण ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. याबाबत त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या २५-१५ योजनेअंतर्गत काले आणि किरपे गावातील विकासकामांसाठी एकूण ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीच्या माध्यमातून काले येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (३० लाख), किरपे येथील मारुती काशिनाथ देसाई ते पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), जिजामाता पाण्याची टाकी ते शिवाजी खाशाबा माने घर रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), कृष्णा गणपती माने ते पार्वती रतु माने घर रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), विकास जिजाबा देवकर ते संजय मारुती देवकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), तांबवे शिव ते मारुती काशिनाथ देसाई घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख) अशा एकूण ८० लाखांच्या विकासकामांचा समावेश आहे.

सदरच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याने, काले व किरपे गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमधून मंत्री ना. जयकुमार गोरे, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानण्यात येत आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradSouth #KaleVillage
#KirpeVillage #RoadDevelopment
#RuralDevelopment #GramVikas
#PanchayatiRaj #JaykumarGore
#AtulBabaBhosale #BJP
#MahayutiGovernment #SataraNews
#ChangbhalaNews #DevelopmentWorks
#InfrastructureDevelopment

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या