पुणे प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या एका महत्त्वपूर्ण यशाची नोंद झाली असून डॉ. स्वाती रघुनाथ देवकर / डॉ. स्वाती विक्रम पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून “Development and Characterization of Nanofibers as a Novel Drug Delivery System” या अत्याधुनिक विषयावर यशस्वीपणे पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
नॅनोतंत्रज्ञान आणि औषध वितरण प्रणाली (Drug Delivery System) या आधुनिक व भविष्यकालीन संशोधन क्षेत्रात डॉ. स्वाती यांनी केलेले संशोधन अत्यंत नाविन्यपूर्ण व उपयुक्त ठरत आहे. नॅनोफायबर्सच्या विकास व वैशिष्ट्यांवर आधारित त्यांच्या संशोधनामुळे औषध वितरण अधिक प्रभावी, सुरक्षित व नियंत्रित पद्धतीने करता येण्याची नवी दारे उघडली आहेत.
त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत आजवर
✔️ २ पेटंट्स,
✔️ १ कॉपीराइट,
✔️ ३ आंतरराष्ट्रीय संशोधन लेखांचे प्रकाशन
अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी साध्य केली आहे.
अथक मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास, सातत्य आणि विज्ञानावरील निष्ठा यांचे हे यशस्वी फलित असून संशोधन क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➖➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या