🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

अहिंसा व करुणेचा संदेश देणारी गोसेवा समाजासाठी प्रेरणादायी : ना भरत पाटील

 

कराड येथील श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्थेच्या गोशाळेस भेट देताना राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक भरत पाटील व उपस्थित मान्यवर

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

श्री भगवान महावीर यांच्या अहिंसा, करुणा आणि प्राणीमात्रावर दया करण्याच्या शिकवणीचे तंतोतंत पालन जैन समाज करत असून, त्याच विचारांची प्रचिती देणारे कार्य श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्था करत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक भरत पाटील यांनी काढले.
कराड येथे श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्थेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या गोशाळेस त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, अहिंसा ही केवळ तत्वज्ञान न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य ही संस्था करत आहे. सध्या या गोशाळेमध्ये दीडशेहून अधिक गोवंश व अन्य पशुंचे संगोपन व संवर्धन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहे, ही बाब समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. गोसेवेतून सामाजिक बांधिलकी श्री भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे प्राणीमात्रावर करुणा दाखवणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे सांगत, अनाथ, जखमी व आजारी पशुंची सेवा करणे म्हणजेच खरी समाजसेवा आहे, असेही त्यांनी नमूद केले. गोशाळेमध्ये पशुंच्या आहार, औषधोपचार, स्वच्छता आणि संरक्षणाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.


या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सौरव पाटील (तात्या), खासदार छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक जवाहर पवार, अ‍ॅड. महादेव साळुंखे, आशिष ओसवाल, भरत ओसवाल, जितेंद्र ओसवाल, विनोद ओसवाल, केतन कटारिया, रुपेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#गोसेवा #अहिंसा #करुणा #भगवानमहावीर
#जैनसमाज #महावीरगोपालनसेवा
#कराड #BharatPatil #सामाजिकबांधिलकी
#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या