कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
राज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिका निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. एकूण २९ महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रभारी यांची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड केली आहे.
श्री. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेची निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यानंतर इचलकरंजी महापालिकेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#BalasahebPatil #इचलकरंजीन्यूज #KolhapurNews
#BreakingNews, #NCPSP, #ChangbhalaNews
#politics, #KaradPolitics #KolhapurPolitics

0 टिप्पण्या