🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक साळुंखे यांना 2026 चा ‘घडशी समाज जीवन गैरव पुरस्कार’ प्रदान

 

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक लक्ष्मण साळुंखे यांना जेजुरी येथे घडशी समाज जीवन गैरव पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर

जेजुरी | चांगभलं वृत्तसेवा

वैद्यकीय क्षेत्रात समाजोपयोगी व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा. श्री. अशोक लक्ष्मण साळुंखे यांना 2026 चा घडशी समाज जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य घडशी समाज सेवा संस्थेतर्फे तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत आयोजित संगीतकार दिवंगत विश्वनाथ मोरे स्मृतिप्रीत्यर्थ युवा कला महोत्सव व कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या पुरस्कार वितरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

भारतीय संगीताची परंपरा ही केवळ श्रवणानुभवापुरती मर्यादित नसून ती थेट माणसाच्या हृदयाशी संवाद साधणारी आहे. सनईचे सूर मांगल्य, शुभत्व व सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. सनई व चौघडा वाजवण्याची परंपरा घडशी समाजाने पिढ्यान्‌पिढ्या जपली असून शेकडो वर्षांपासून या कलेचे जतन केले आहे. पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव वाढत असतानाही घडशी समाजाने भारताच्या प्राचीन संगीत संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली आहे, असे प्रतिपादन लेखक व माजी प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी केले. ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या महोत्सवाचे उद्घाटन जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई व उपाध्यक्ष गणेश निकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, घडशी समाज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिलजी शंकरराव पवार व सचिव मा. श्री. शरद धुमाळ यांच्या हस्ते पार पडला.


मंदिर संस्कृतीचे उपासक म्हणून तसेच कला, संस्कृती व धार्मिक मांगल्याचे सनईवादक म्हणून घडशी समाजाची ओळख आहे. तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत कुलदैवत खंडोबा देवाची सेवा करणारा हा समाज आपल्या हृदयात असल्याचे भावनिक उद्गार नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी यावेळी व्यक्त केले.

समाजातर्फे आयोजित युवा कला महोत्सवात मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील कलाकारांनी सहभाग नोंदवला. चौघडा या लोकपारंपरिक वाद्यावर तसेच सेक्सोफोन या वेस्टर्न वाद्यावर वंदना साळुंखे या महिला कलाकाराने आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.

याप्रसंगी माजी विश्वस्त संदीप जगताप, नगरसेवक अस्लम पानसरे, रोहित खोमणे, शिवाजी जगताप, प्रशांत लाखे, दादा उबाळे, सुनील असवलीकर, सचिन खोमणे, माऊली खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम मोरे यांनी केले, तर निवेदनाची जबाबदारी नगरसेवक समीर मोरे यांनी सांभाळली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#Jejuri #GhadshiSamaj
#AshokSalunkhe #JeevanGauravPuraskar
#KalaMahotsav #VishwanathMore
#SangeetSanskruti #SanaiVadak
#Chaughada #Khandoba
#ChangbhalaNews #SataraNews
#MaharashtraNews #CulturalHeritage

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या