कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार काले जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. मनीषा दयानंद पाटील तसेच पंचायत समिती कालवडे गणाच्या उमेदवार सौ. तेजश्री विश्वजित थोरात यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.
या प्रचारावेळी युवा नेते पारस प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांनीही या भेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
यावेळी विलास मोहिते नाना, मारुती मोहिते उर्फ बलूभाऊ, उदयसिंह मोहिते, हणमंत मोहिते, बिपीन मोहिते, सुशांत र. मोहिते, प्रशांतदादा मोहिते यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घरोघरी संपर्क अभियानामुळे प्रचाराला बळ मिळाल्याचे चित्र बेलवडे बुद्रुक परिसरात पहायला मिळाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#BJP #KaleZPElection #AtulBhosale

0 टिप्पण्या