🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुक्यातील मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना ; निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांचे मार्गदर्शन

 

कराड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी मतदान साहित्यांसह एसटी बसद्वारे मतदान केंद्रांकडे रवाना होताना

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

शनिवार, दिनांक ७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कराड तालुक्यातील एकूण ४८६ पथकांतील मतदान कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर ६६ एसटी बस, १८ मिनी बस व ८ जीपमधून आपापल्या मतदान केंद्राकडे आवश्यक मतदान साहित्यांसह आत्मविश्वासाने रवाना झाले.
मतदान प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना तिसऱ्या प्रशिक्षणाअंतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया ही पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध पद्धतीने पार पाडावी, तसेच मतदारांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर मतदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी साहित्याची सखोल तपासणी करून खात्री केली व सर्व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी प्रशासनामार्फत बस, मिनीबस तसेच जीप अशा वाहनांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शांततेत, पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.


पथकासोबत मेडिकल किट .... मच्छर अगरबत्तीही..!


निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीची शांत झोप घेता यावी व दिवसभर उत्तम कामकाज करता यावे यासाठी मच्छरांपासून संरक्षण म्हणून प्रत्येक टीमसोबत मच्छर अगरबत्ती देण्यात आली आहे. तसेच आरोग्याची काळजी म्हणून मेडिकल बॉक्स व त्यावर कोणत्या आजारासाठी कोणती गोळी याच्या माहितीसह प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात आले आहे, तसेच प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षांनी दीड दिवसाचा डॉक्टर बनून आपल्या टीमच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगताच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून या निर्णयाला दाद दिली. कर्तव्यावर जाताना अतुल म्हेत्रे हे आरोग्याची काळजी घेणारे आजपर्यंतचे एकमेव निवडणूक निर्णय अधिकारी असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून दिसून येत होती.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराडतालुका #कराडनिवडणूक
#जिल्हापरिषदनिवडणूक #पंचायतसमितीनिवडणूक
#मतदानकर्मचारी #मतदानतयारी
#ElectionDuty #AtulMhetre #प्रांताधिकारी
#KaradNews #SataraNews
#MaharashtraElections #लोकशाही
#निर्भयमतदान #Election2026 #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या