🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

बिबट्याने पायावर पंजा मारल्याने आदिराज पाटील-उंडाळकर किरकोळ जखमी ; उंडाळेनजीक घडली घटना

 

आदिराज पाटील-उंडाळकर

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड दक्षिण मधील शेवाळेवाडी-उंडाळे मार्गावरून डबल सीट दुचाकीवरून येत असताना ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे नातू आदिराज पाटील-उंडाळकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये पाटील यांच्या एका पायावर बिबट्याने पंजा मारल्याने ‌ते किरकोळ जखमी झाले आहेत.
आदिराज पाटील यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शेवाळेवाडी परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन उंडाळेकडे डबल सीट दुचाकीवरून येत असताना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आदिराज पाटील तसेच दुचाकी चालक धनाजी पाटील दोघेही सुखरूप आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या