🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड तालुक्यात शांततेत मतदान; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 52.20 टक्के मतदान ; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भोसले परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

 

रेठरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याची खूण दाखवताना आमदार डॉ ‌ अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले व इतर

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सकाळपासून टप्प्याटप्प्याने मतदानाची टक्केवारी वाढत असल्याचे चित्र आहे.

रेठरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले आणि श्री. विनायक भोसले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.


दरम्यान, कराड तालुक्यातील चचेगाव येथे मतदान सुरू होण्यास उशीर झाल्याची माहिती सकाळी माध्यमांतून समोर आली होती. मात्र सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आता सुरळीत सुरू असून कोणतीही अडचण नाही, अशी माहिती तहसीलदार कराड यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील मतदान टक्केवारी (वेळेनुसार):
सकाळी ७.३० ते ९.३०
▪️ पुरुष – १९,९४९
▪️ स्त्री – ९,४४७
▪️ एकूण – २९,३९६
▪️ टक्केवारी – ७.२३%

सकाळी ११.३० पर्यंत.
▪️ पुरुष – ५२,८६१
▪️ स्त्री – ३५,०७१
▪️ इतर – १
▪️ एकूण – ८७,९३३
▪️ टक्केवारी – २१.६३%

सकाळी दुपारी १.३० पर्यंत.
▪️ पुरुष – ८२,२७५
▪️ स्त्री – ७०,३४९
▪️ इतर – १
▪️ एकूण – १,५२,६२५
▪️ टक्केवारी – ३७.५४%

▪️ दुपारी 3.30 पर्यंत
▪️पुरुष - 108994
▪️स्त्री - 103267
▪️इतर-3
▪️एकूण = 212264
▪️टक्केवारी - 52.20
यामध्ये महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय असून दुपारपर्यंत मोठ्या संख्येने महिलांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, वडगाव हवेली येथे बोगस मतदानाच्या आरोपावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गट आमने-सामने आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
एकूणच कराड तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या