कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून 2027 पर्यंत स्टेडियमचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. भविष्यात येथे आयपीएल सामने आयोजित करता येतील, अशा दर्जाचे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कराड नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आमदार भोसले यांनी कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. दर्जाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत विटांचा दर्जा, पायाभूत सुविधा, संरचना व वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना दिल्या.
रनिंग ट्रॅक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक निकषांनुसार तयार होत आहे का, याची विशेष चौकशी करण्यात आली. ट्रॅकसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅटचे टेक्स्चर, गुणवत्ता आणि संबंधित कंपन्यांची निवड याबाबतही चर्चा झाली. स्टेडियममध्ये पाच बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचा प्रस्ताव असून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे घेता याव्यात, या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीकडून ‘बार चार्ट’ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दर महिन्याला प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येणार असून नगरपालिकेने त्यावर नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करण्याचाही प्रस्ताव चर्चेत आला.
![]() |
बैठकीस कराड पालिकेतील भाजपाचे गटनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, माजी नगरसेविका सौ. स्मिता हुलवान, माजी नगरसेवक अतुल शिंदे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जयवंत पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. कामाचा दर्जा आणि वेळापत्रक याबाबत सर्वांनी एकमताने सकारात्मक भूमिका घेतली.
#Karad #ChhatrapatiShivajiMaharajStadium #AtulBhosale #KaradDevelopment #MaharashtraSports #IPLKarad #SportsInfrastructure #KaradNews #ChangbhalaNews #सातारा #कराड #क्रीडासंकुल #आयपीएल #विकासकाम



0 टिप्पण्या