🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

चांगल्या निर्णयाला पाठिंबा देऊ ; मात्र चुकीच्या बाबींना विरोध करू - नगरसेवक विजय वाटेगावकर

 कराड नगरपालिकेतील विरोधी गटाच्या भूमिकेचे होतेय सर्वत्र कौतुक


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड शहराला स्वतःची वेगळी ओळख आणि नगरपालिकेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे पालिकेच्या नूतन नगराध्यक्षांवर मोठी जबाबदारी आहे, त्यानुसार ते काम करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या चांगल्या निर्णयांना आम्ही विरोधकांच्या भूमिकेत असलो तरी शहराचे हित लक्षात घेऊन पाठिंबा देऊ, चांगल्या निर्णयांचे नक्की स्वागतच करू, पण चुकीचं काही घडत असेल तर, ते सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ, प्रसंगी अशा चुकीच्या गोष्टींना सभागृहात विरोध करू, अशी स्पष्ट, परखड आणि थेट भूमिका कराड नगरपालिकेतील विरोधी गटाचे तथा भाजपचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडली.

कराड नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आज नगरपालिकेत पदभार स्वीकारला. यावेळी विरोधक म्हणून सभागृहातील भूमिका कशी राहील हे भाजपचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी स्पष्ट आणि थेट मांडले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, सुभाषराव पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

‌‌ वैयक्तिक राजकीय भूमिका बाजूला ठेवून काम करा
- माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची सूचना

नगराध्यक्षांच्या पदभार समारंभाला आज सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहिले, हे सकारात्मक चित्र आहे. तरीही नगरपालिकेत काम करताना वैयक्तिक राजकीय भूमिका बाजूला ठेवाव्या लागतील. कराड नगरपालिकेला आदर्श नगरपालिका बनवण्यासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच नगरपालिकेच्या अधिनियमांची पुस्तिका सर्व नगरसेवकांना देण्यात आली आहे, अशी अपेक्षा आणि सूचना माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

फारुक पटवेकर, अल्ताफ शिकलगार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, विरोधाला विरोध न करता, चांगल्या कामांना साथ आणि चुकीच्या बाबींनाच विरोध करण्याची भूमिका भाजपच्या वतीने नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी मांडली. या भूमिकेचे शहरात कौतुक होत आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराडनगरपालिका #KaradNagarpalika

#KaradNews #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या