कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक (ता. कराड ) येथील श्रीमती पुष्पमाला रंगराव मोहिते यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 'माई' म्हणून गावात परिचित होत्या.
राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे कराड तालुका अध्यक्ष शिवाजीराव रंगराव मोहिते (सरकार), माजी सैनिक संताजीराव मोहिते, प्रगतशील शेतकरी सयाजीराव मोहिते यांच्या त्या मातोश्री तर रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव माणिकराव मोहिते यांच्या त्या काकी होत्या. आपल्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे माईंनी गावात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने मोहिते (सरकार) कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. रक्षाविसर्जन विधी रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता बेलवडे बुद्रुक येथे होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या