🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा जल्लोष; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते २० व्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

 ४०० स्टॉल्स, पशु–पक्षी दालन आणि नवतंत्रज्ञान; शेती, उद्योग आणि पशुपालनाचा संगम

कराड येथे आयोजित २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तयारी पूर्ण


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


कराड येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सव शुक्रवार दि. 26 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पर्यटन व खनिकर्म मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.


उद्घाटन सोहळ्यास मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार नितीन काका पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, राज्याचे पणन संचालक संजय कदम, धैर्यशील कदम,बाळासाहेब सोळसकर,रामकृष्ण वेताळ,अविनाश मोहिते,राजेश पाटील वाठारकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, संस्थाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


शुक्रवार दि. 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन, तर सायंकाळी 4 वाजता कृषिमंत्री व मान्यवरांच्या शुभहस्ते मुख्य उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ऊस पीक स्पर्धा व प्रदर्शन तसेच नाविन्यपूर्ण कृषी अवजारे निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता केळी घड प्रदर्शन व स्पर्धा, तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत “उत्सव कृषी सौभाग्यवतींचा – खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कलाकार वासू पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.


रविवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फुले प्रदर्शन व स्पर्धा, गाय–म्हैस–बैल प्रदर्शन व स्पर्धा होणार आहे.

सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान (डॉग) प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत.
मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी भाजीपाला पीक, शेळी–मेंढी व पक्षी प्रदर्शन व स्पर्धा होणार असून सायंकाळी 4 वाजता समारोप होईल. यावेळी स्पर्धा बक्षीस वितरण व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी शिरसागर तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित राहणार आहेत.


लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे यंदा २० वे वर्ष असून या प्रदर्शनाची ख्याती राज्यभर पसरली आहे. राज्यातील मोजक्या दर्जेदार कृषी प्रदर्शनांमध्ये याची गणना होते.


या प्रदर्शनाचे आयोजक शेती उत्पन्न बाजार समिती कराड, कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा व महाराष्ट्र शासनाचा आत्मा विभाग असून विविध शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शनातून शेतकऱ्यांना व उद्योजकांना सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान मिळणार आहे. कृषी व औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढविणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे. 

यावर्षी सुमारे 400 स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नवीन तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स यांचा समावेश असेल. 


डायनॅमिक इव्हेंटचे मॅनेजर धीरज तिवारी व सचिन पाटील यांनी प्रदर्शनाच्या स्टॉलची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.सदर कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधव,नागरिक यांनी घ्यावा, असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#YashwantraoChavanKrushiPradarshan
#KaradKrushiMela #SataraNews
#ChangbhalaNews #KrushiMahotsav
#AgricultureExhibition #FarmersExpo
#PashupakshiPradarshan #KrushiVikas
#MaharashtraAgriculture #KaradUpdates
#ShetiBatmi #AgroIndustry
#KrushiTantraDnyan #कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या