🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘कृष्णा’ला सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्कार जाहीर

 व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार

VSI पुरस्कार जाहीर – कृष्णा सहकारी साखर कारखाना व चेअरमन डॉ. सुरेश भोसले


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने व्ही.एस.आय.च्या २ पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे. सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठीचा कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्कार कृष्णा कारखान्याला विभागून जाहीर झाला आहे. तसेच कृष्णा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे करण्यात आली. गेली ११ वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. सन २०२४-२५ या गळीत हंगामात कारखान्याने १२,३९,००८ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून, १५,५७,४३९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच साखर उतारा १२.५७ इतका राहिला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ १९.८७ टक्के केली असून, वाफेचा वापर ३४.६९ टक्क्यांवरून कमी करून ३१.०६ टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले आहे. यासाठी साखर प्रक्रिया प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. मिलिंग, साखर प्रक्रिया, सहवीजनिर्मिती, आसवनी व इथेनॉल प्रकल्पामध्ये स्वयंचलित यंत्रणांचा वापर करून उत्पादन कार्यक्षमतेत वाढ साधण्यात आली आहे. ऊर्जाबचतीच्या दृष्टीने साखर कारखाना, सहवीजनिर्मिती व आसवनी प्रकल्पामध्ये एनर्जी इफिशिएंट मोटर्स व पंपांचा वापर करण्यात येत आहे. कारखान्याने ऊस बेणेमळा, रोप निर्मिती व ऊस बेणे बदल यावर विशेष भर दिला असून, शेतकऱ्यांना उत्तम प्रतीच्या कृषी निविष्ठांचा पुरवठा व ऊस उत्पादन वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन सातत्याने दिले जाते. एकूणच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ऊर्जा बचत, उत्पादन कार्यक्षमता व आर्थिक शिस्त यांच्या जोरावर कृष्णा कारखान्याने हंगाम २०२४–२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

तसेच कृष्णा कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी प्रदीप नांगरे (मु.पो. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) यांना खोडवा हंगामासाठी कै. अण्णासाहेब शिंदे राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे केले जाणार आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



कृष्णा कारखान्याचा नफा निर्देशांक चांगला...

आर्थिक कामगिरीच्या दृष्टीने कृष्णा कारखान्यात साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च ५३१.६३ रुपये इतका असून, तो राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च ८६९.५८ रुपये प्रति क्विंटल इतका असून, तोही राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे कारखान्याचा नफा निर्देशांक चांगला असून, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो देखील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक चांगला आहे. याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने व्ही.एस.आय.ने. घेतली आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KrishnaSugarFactory #कृष्णासहकारीसाखरकारखाना #VSIAward #VasantdadaSugarInstitute #StateLevelEntrepreneurshipAward #VilasaravDeshmukhAward #ऊसभूषणपुरस्कार #SugarIndustryMaharashtra #RethareBudruk #KaradNews #DrSureshBhosale #SugarSeason202425 #EnergyEfficientSugarMill #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या