कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्ष प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी आयोजित ऊस पिक स्पर्धेत तांबवे ता. कराड येथील ओंकार पांडुरंग पाटील व येणके ता. कराड येथील प्रशांत हिंदुराव गरुड यांच्या ऊस पिकाला विभागून प्रथम क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत पाल तालुका कराड येथील संभाजी बाजीराव पाटील व तांबवे तालुका कराड येथील पंढरीनाथ मोहन पाटील यांच्या ऊस पिकाला विभागून द्वितीय क्रमांक मिळाला. तर खानापूर तालुक्यातील आळसुंद येथील पल्लवी अशोक जाधव, व कोपर्डे हवेली जि. सातारा येथील जितेंद्र विनायक निकम यांच्या ऊस पिकाला विभागून तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ अशी पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीसे व शील्ड ट्रॉफी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत संदीप शंकर नांगरे रा. वसंतगड ता. कराड व अभिजीत माणिकराव यादव रा. नारायणवाडी ता. कराड यांच्या ऊस पिकाला उत्तेजनार्थ सन्मान देण्यात आला, अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृषीप्रदर्शन #यशवंतरावचव्हाणकृषीप्रदर्शन #कराड
#चांगभलंन्यूज #KaradNews #Karad #ChangbhalaNews


0 टिप्पण्या