कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगर परिषद व मलकापुर नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने कराड शहरातील अंतर्गत वाहतुक मार्गात स. ६ ते सायं. ८ वाजेपर्यंत तात्पुरता बदल करणेत येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तसेच वाहतुकीची कोंडी होवु नये, अपघात घडु नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीचे मार्गात बदल करणे आवश्यक असून अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सदरचा आदेश सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी जाहीर केला आहे.
दरम्यान कराड नगर परिषद, कराड च्या मतमोजणीचे कामकाज स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड येथे होत असल्याने पुढिलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात येत आहे.
मार्ग १) महालक्ष्मी चौक, कराड येथुन मुंबई आईस्क्रीम चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे येत असुन, सदरची वाहने पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक मार्गे किंवा कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर बैल बाजार रोडने जातील.
२) बैलबाजार रोड, कराड येथुन महालक्ष्मी चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना मुंबई आईस्क्रीम चौक येथुन प्रवेश बंद करणेत येत असुन, सदरची वाहने भेदा चौक मार्गे किंवा बैलबाजार रोड, मलकापुर हायवे रोडने कराड शहरात जातील.
३) सुपर मार्केट, कराड येथुन गणेश हॉस्पीटलकडे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे.
४) मोहीते हॉस्पीटल, कराड येथुन स्व. यंशवतराव चव्हाणा बहुउद्देशीय हॉल, कराड बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे.
५) मुंबई आईस्क्रीम ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथील संपुर्ण रोड, झेंडा चौक ते गणेश हॉस्पीटल जाणारा संपुर्ण रोड व पी.डी. पाटील उद्यान समोरील कॉलनीतील रोड मतपेटी नेणारे एस.टी. बस, स्कुल बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्कीग करीता आरक्षित केलेला असुन, सदर रोडवर खाजगी वाहने पार्कीग करणेस सक्त मनाई करणेत आली आहे. मात्र वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने व निवडणुक प्रक्रियेतील वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणेत येत आहे.
तसेच मलकापुर नगर पंचायत, मलकापुर निवडणुकीची मतमोजणी स्व. यशवंतराव चव्हाण बचत भवन हॉल, पंचायत समिती ऑफीस, दैत्य निवारणी मंदीर शेजारी, कराड येथे होणार असून या अनुषंगाने
मार्ग १) अजंठा वे ब्रीज, कराड येथुन दैत्य निवारणी चौक बाजुकडे जाणाऱ्याऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येत असुन, सदरची वाहने पोपटभाई पेट्रोल पंप येथुन दत्त चौक रोडने कराड शहरात किंवा पोपटभाई पेट्रोल पंप येथुन कोल्हापुर नाका मार्गे वारुंजी, पाटण बाजुकडे जातील.
२) पाटण तिकाटणे येथुन दैत्य निवारणी चौक बाजुकडे जाणारे सर्व वाहनांना सहयाद्री हॉस्पीटल येथुन प्रवेश बंद करणेत येत असुन, सदरची वाहने पाटण तिकाटणे येथुन कोल्हापुर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कराड शहरात जातील.
३) शाहु चौक, कराड येथुन दैत्य निवारणी चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे.
४) अजंठा वे ब्रीज, पंकज हॉटेल ते अजंठा वे ब्रीज जाणारा रोड, कराड ते दैत्य निवारणी चौक, शाहु चौक ते दैत्य निवारणी चौक व सहयाद्री हॉस्पीटल ते दैत्य निवारणी चौक जाणारा संपुर्ण रोड मतपेटी नेणाऱ्या एस.टी. बस, स्कुल बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांच्या पार्कीग करीता आरक्षित करणेत आला असून सदर रोडवर खाजगी वाहने पार्कीग करणेस मनाई करणेत येत आहे.
दरम्यान वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने व निवडणुक प्रक्रियेतील वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरील प्रमाणे बदल करणेत येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #MalakapurNews #नगरपरिषदनिवडणूक #मतमोजणी #KaradTrafficUpdate #TrafficDiversion #SataraPolice #TusharDoshi #ElectionCounting #KaradCity #Malakapur #LocalElections #PublicNotice #MarathiNews #ChangbhalaNews

0 टिप्पण्या