नवी दिल्ली | चांगल वृत्तसेवा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सकाळी ११ वाजता मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संसदेत सादर केला. हा त्यांचा सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प असून, या निमित्ताने त्यांनी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. सलग नऊ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
देशातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योगक्षेत्र आणि शेतकरी वर्गाचे या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने लक्ष लागले होते. विशेषतः काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता होती.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतात उत्पादित होणाऱ्या अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये चामडे आणि कापड उद्योगाशी संबंधित उत्पादनांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी शुल्क सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या काही वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णतः माफ करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्प 2026 मध्ये कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
कपडे
चामड्याच्या वस्तू व चामड्याची उत्पादने
सिंथेटिक पादत्राणे
17 कर्करोग व मधुमेहावरील औषधे (शुल्कमुक्त)
लिथियम-आयन बॅटरी
मोबाइल बॅटरी
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे सोलार ग्लास
मिश्र वायू सीएनजी
इलेक्ट्रिक वाहने (EV)
मायक्रोवेव्ह ओव्हन
विमान इंधन
परदेश प्रवासाचा खर्च
कोणत्या वस्तू महाग होणार?
काही क्षेत्रांमध्ये कस्टम ड्युटी वाढविण्यात आली असून त्यामुळे पुढील वस्तू महाग होण्याची शक्यता आहे –
दारू
भंगार
सिगारेट
खनिजे
पीव्हीसी फ्लेक्स शीट
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,
“आत्मनिर्भर भारत हे सरकारचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देणे आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, या दिशेने ठोस पावले उचलण्यात आली आहेत.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रोजगारनिर्मिती, कृषी उत्पादकता वाढवणे, सामान्य नागरिकांची खरेदी क्षमता सुधारणे आणि सर्वसामान्यांना सार्वत्रिक सेवा देण्यासाठी विविध सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या धोरणांमुळे देशाचा आर्थिक विकासदर सुमारे ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, गरिबी कमी करण्यास व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#केंद्रीयअर्थसंकल्प #बजेट 2026 #निर्मलासीतारामन
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या