🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा – आ. डॉ. अतुलबाबा भोसले

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 संदर्भात  आ. डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष भाजपा सातारा यांची प्रतिक्रिया

कराड | चांगभलं वृत्तसेवा. 


"देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प असून, यातून विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्यास बळ मिळणार आहे.

या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी विशेष महत्त्वाच्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणीसाठी करण्यात आलेली तरतूद ही मुलींच्या शिक्षणाला बळ देणारी आहे.

तसेच रस्ते आणि महामार्ग विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून देशातील दळणवळण अधिक सक्षम करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेती आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या तरतुदीदेखील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प हा ग्रामीण भागातील अर्थचक्र मजबूत करणारा आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवक यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असून देशाच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे."

- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
जिल्हाध्यक्ष, भाजपा, सातारा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#DrAtulBabaBhosale #BJPSatara #BJPKarad

#बजेट2026 #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या