कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना १०१ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अशोक गुजर, जयंत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव थोरात, जयवंतदादा जगताप, प्रांतिधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, धोंडिराम जाधव, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, निवासराव थोरात, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, अविनाश खरात, दत्तात्रय देसाई, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, पैलवान आनंदराव मोहिते, मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनावले, नवनिर्वाचित नगरसेवक मनोहर शिंदे, हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे, राजश्री जगताप, गीता साठे, अश्विनी शिंगाडे, सुनीता पोळ, रंजना पाचुंदकर, कल्पना रैनाक, शरद पवार, धनंजय येडगे, प्रमोद शिंदे, डॉ. स्वाती थोरात, माजी नगरसेवक राजेंद्र यादव, दिनेश रैनाक, शहाजी पाटील, राहुल यादव, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे,
#सहकारमहर्षी #जयवंतरावभोसले #आप्पासाहेब
#JaywantraoBhosale #KrishnaGroup
#KrishnaSugarFactory #KrishnaHospital
#KrishnaBank #KaradNews
#Karad #WalvaTaluka #CooperativeMovement
#MaharashtraNews #JayantiSpecial
#ChangbhalaNews #SocialDevelopment
#EducationHealthDevelopment


0 टिप्पण्या