कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
‘ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम’ २०२५–२६ अंतर्गत यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथील कृषीदुतांचे म्होप्रे गावात आगमन झाले. या कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूत गावात वास्तव्यास राहून ग्रामीण शेती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषीतंत्राचा सखोल अभ्यास करणार आहेत.
यावेळी कृषीदुतांचे स्वागत सरपंच सुमन तुकाराम डुबल, ग्रामसेवक अरविंद माळी, सहाय्यक कृषी अधिकारी प्राजक्ता पाटील तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख व्हावी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये आधुनिक कृषीतंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच अत्याधुनिक शेतीतंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, मृदा परीक्षण, शेतीतील नवकल्पना यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या उपक्रमात कृषीदूत विवेक चव्हाण, विश्वजीत देशमुख, प्रज्वल खडके, ओंकार खटके, महेश खुर्द, प्रथमेश आवताडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदिरा घोनमोडे, केंद्रप्रमुख डॉ. राणी निंबाळकर, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. दत्तात्रय मुरूमकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. योगेश कांदळकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय नावडकर, डॉ. अर्चना मोहिते तसेच कृषीविस्तार विषयतज्ज्ञ डॉ. नंदकिशोर टाले यांच्यासह इतर विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ChangbhalaNews
#KaradNews
#SataraNews
#RuralAgriculture
#KrushiDoot
#AgricultureAwareness
#KrushiTantra
#YCMKarad
#GovernmentAgricultureCollege
#MhopreVillage
#KrushiVistar
#FarmersAwareness
#AgricultureEducation
#RuralDevelopment


0 टिप्पण्या