🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

लढले नाहीत, पण जिंकवले – कराडमध्ये बाळासाहेब पाटीलच किंगमेकर !

 

कराड नगरपालिका निवडणूक निकालानंतर गुलालात न्हालेले माजी मंत्री बाळासाहेब पाटील, कराडच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून उभे राहिलेले नेतृत्व

थेट मैदानात नसतानाही संपूर्ण खेळ हातात : कराडच्या निकालात बाळासाहेब पाटील फॅक्टर

हैबत आडके, कराड | चांगभलं न्यूज

हर शख़्स को 'ताज' पहनाने का हुनर नहीं आता,

कुछ लोग पर्दे के पीछे रहकर भी 'राज' चलाते हैं।


कराड नगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नव्हती, तर कराडच्या राजकीय इतिहासातला एक निर्णायक टप्पा ठरला. तब्बल ७३ वर्षांनंतर दिवंगत आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांचे कुटुंब या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर राहिले. कराडच्या राजकारणात ज्यांचे अस्तित्व केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि भावनिक पातळीवर खोलवर रुजलेले आहे, त्या कुटुंबाचा थेट सहभाग नसतानाही या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल अनेक अर्थांनी बोलका ठरला.



या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीचे सर्वोच्च नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणुकीपूर्व पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन स्थानिक प्रश्न, सामाजिक शांतता, व्यापारी वर्गाची सुरक्षितता आणि शहरातील सलोखा या मुद्द्यांवर एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले होते. निवडणुकीनंतर आलेल्या निकालांनी या भूमिकेला जनतेने दिलेली संमती ठळकपणे अधोरेखित केली आहे.

लोकशाही आघाडीला या निवडणुकीत सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळाला आणि ही आघाडी शहरातील क्रमांक एकची राजकीय शक्ती ठरली. भाजपने पक्ष चिन्हावर लढत १० जागा मिळवल्या, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील यशवंत विकास आघाडीला ७ जागांवर समाधान मानावे लागले. एका अपक्ष उमेदवाराने स्वतंत्रपणे विजय मिळवला. काँग्रेसला मात्र मलकापूरप्रमाणेच कराडमध्येही खाते उघडता आले नाही, ही बाब राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अधोगतीची साक्ष देणारी ठरली.



या संपूर्ण राजकीय पटात केंद्रस्थानी ठरले ते नगराध्यक्षपदाचे निकाल. लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारे राजेंद्रसिंह यादव यांनी तब्बल २४०९६ मते मिळवली. भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांना १४३६१ मते मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रणजीतनाना पाटील यांनी ६६५१ मते घेत तिसरे स्थान पटकावले. काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण यांना अवघी २३०९ मते मिळाली आणि ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. परिणामी राजेंद्रसिंह यादव यांनी ९७३५ मताधिक्याने नगराध्यक्षपदावर निर्विवाद विजय मिळवला.

या विजयाचा अर्थ केवळ एक नगराध्यक्ष निवडून येणे एवढाच मर्यादित नाही. हा विजय बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय धोरणाचा, त्यांच्यावरील जनविश्वासाचा आणि स्थानिक राजकारणात त्यांच्या निर्णायक भूमिकेचा पुनःप्रत्यय देणारा ठरला. थेट निवडणूक न लढवता, सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याची कला बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा दाखवून दिली.



लोकशाही आघाडीच्या १३ विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग १ अ मधून रूपाली माने यांनी ६८२, प्रभाग १ ब जयवंत पाटील यांनी ६९७, प्रभाग २ अ नीलम कदम यांनी ८७०, प्रभाग २ ब सुहास पवार यांनी ७१६, प्रभाग ३ अ रजिया आंबेकरी यांनी ६७५, प्रभाग ३ ब प्रवीण पवार यांनी १८४, प्रभाग ५ अ अरुणा पाटील यांनी ८९८, प्रभाग ५ ब राहुल भोसले यांनी १९४२, प्रभाग ९ अ मिनाज पटवेकर यांनी १८६०, प्रभाग ९ ब प्रताप साळुंखे यांनी १६२५, प्रभाग १५ अ योगिता जगताप यांनी १०६७, प्रभाग १५ ब अख्तरहुसेन आंबेकरी यांनी १४०७, तर प्रभाग १५ क मधून ११५२ मताधिक्य मिळवत निवडणुकीतील विजयावर नाव कोरले.

यशवंत विकास आघाडीच्या सात विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग ४ अ प्रियांका यादव १३, प्रभाग ४ ब अर्चना ढेकळे ५८, प्रभाग ६ ब अल्ताफ शिकलगार ५७७, प्रभाग १० अ आशा मुळे ७४४, प्रभाग १२ अ अनिता पवार ५२१, प्रभाग १२ ब विजय यादव ५२९ आणि प्रभाग १३ अ कीर्तिका गाढवे ५९२ मताधिक्याने विजयी झाल्या.



भाजपचे १० उमेदवार विजयी झाले असले, तरी मोठ्या प्रमाणावर इनकमिंग करूनही सत्ता हस्तगत करण्यात पक्ष अपयशी ठरला. प्रभाग ६ अ शारदा माने २१७, प्रभाग ७ ब अजय पावसकर २१२, प्रभाग ८ अ किशोरी शिंदे ९३३, प्रभाग ८ ब विजय वाटेगावकर १०२८, प्रभाग १० ब सुमित जाधव १३४, प्रभाग ११ अ वैष्णवी वायदंडे १०९, प्रभाग ११ ब गणेश पवार ८५०, प्रभाग १३ ब आशुतोष डुबल १५, प्रभाग १४ अ वर्षा वास्के ६७४ आणि प्रभाग १४ ब शिवाजी पवार १२२२ मताधिक्याने विजयी झाले.



अपक्ष उमेदवार तेजश्री पाटसकर यांनी प्रभाग ७ अ मधून ५५८ मतांनी विजय मिळवत निवडणुकीतील अपक्ष अस्तित्व अधोरेखित केले. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मात्र खातेही उघडता आले नाही. मुस्लिम मतदारांवर मदार ठेवून उतरवलेले काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांना समुदायाने स्वीकारले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.


या सगळ्या घडामोडींचा सार काढला, तर कराडच्या राजकारणात 'किंग' कोण आहे यापेक्षा 'किंगमेकर' कोण आहे, हे अधिक महत्त्वाचे ठरते. आणि या निवडणुकीत कराडकर मतदारांनी निर्विवादपणे दाखवून दिले की 'किंग' कोणीही असो, 'किंगमेकर' मात्र बाळासाहेब पाटीलच आहेत. स्थानिक प्रश्नांवर पक्षीय विचारधारा बाजूला ठेवून निर्णय घेण्याची त्यांची भूमिका, सामाजिक शांततेवर दिलेला भर आणि संयमी नेतृत्वशैली यालाच कराडकरांनी अंतिम कौल दिला आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradMunicipalElection #KaradPolitics
#BalasahebPatil #KingmakerOfKarad
#LokshahiAghadi #YashwantVikasAghadi
#KaradNagarParishad #MaharashtraPolitics
#LocalPolitics #KaradElectionResult
#PoliticalAnalysis #ChangbhalaNews
#KaradNews #नगरपालिका_निवडणूक #कराड_राजकारण #बाळासाहेब_पाटील #लोकशाहीआघाडी

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

विशेष सूचना - कराड मधील भुरट्या किंवा भुरटी पत्रकारांनी (?) बातमी आहे अशी कॉपी करून वापरू नये...! वापरावयाची असल्यास त्यामध्ये स्वतःचे कौशल्य वापरून पूर्णतः बदल करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या