कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
येथील श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये प. सुपने येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी,रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिम्मतराव पाटील (थोरात) यांना सन २०२५ चा श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच नैसर्गिक शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार मा. आमदार महेशजी शिंदे (उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ), मा. आमदार शशिकांत शिंदे (विधानपरिषद), मा. आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल हिम्मतराव पाटील यांचे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, आप्पासाहेब गरुड कराड बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते , कराड तालुक्यासह परिसरातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#HimmatraoPatil
#SevagiriShetiNishthaAward
#ShetiPuraskar2025
#ProgressiveFarmer
#NaturalFarming
#KaradNews
#SataraNews
#RayatSugarFactory
#KrushiBatmya
#MaharashtraAgriculture
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या