🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कराडला ‘साहित्यिक प्रेरणा ज्योत’ मिरवणूक निघणार

 

साहित्य संमेलनानिमित्त कराड मधून निघणार साहित्य प्रेरणा ज्योत

- सहभागी होण्याचे कवयित्री क्रांती पाटील यांचे कराडकरांना आवाहन


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा नगरीत ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक १, २, ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यानिमित्त कराड शहरात १ जानेवारीला "साहित्यिक प्रेरणा ज्योत" मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कवयित्री क्रांती पाटील यांनी दिली.

साताऱ्यातील संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या स्मृती जपण्यासाठी ‘साहित्यिक प्रेरणा ज्योत’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कराड तालुक्यातील साहित्यिक प्रेरणा ज्योत, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते प्रज्वलित होईल. ही ज्योत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन प्रीतिसंगम, कराड येथे प्रज्वलित केली जाणार आहे.

दरम्यान, १ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता प्रीतिसंगम स्थळी उपस्थित राहून या साहित्यिक प्रेरणा ज्योतीच्या मिरवणुकीत कराड तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, अकॅडमी तसेच साहित्य, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्यिक प्रेरणा ज्योत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#साहित्यिकप्रेरणाज्योत #सातारासाहित्यसंमेलन #Karad

#KaradNews #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या