कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मीनाक्षी प्रसन्न रसाळ यांचा गौरव करण्यात आला. समाजातील गुणवंत व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उपक्रमांतर्गत हा सत्कार सोहळा पार पडला.
शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मीनाक्षी प्रसन्न रसाळ यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात मलकापूर नगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्योत्स्ना अभिजीत शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत समाजातील गुणवंतांचा सन्मान ही प्रेरणादायी परंपरा असल्याचे मत व्यक्त केले.
कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील परीट यांनी केले, तर तानाजी पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब यादव, संजय गायकवाड, दिलीपराव नलवडे, चंद्रकांत गायकवाड, नंदकुमार गायकवाड, प्रवीण राक्षे, संदीप पारवे, अजिंक्य राऊत, केदार रसाळ, दिगंबर यादव, श्रीरंग रोकडे, अमोल कोकाटे, सचिन साळुंखे, सागर राऊत, निवास काटकर यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास कराड शहर व तालुक्यातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#संतगाडगेबाबा #परीटसमाज
#कराडतालुका #समाजकार्य
#वधूवरमेळावा #समाजएकता
#गाडगेबाबाविचार #मीनाक्षीरसाळ
#आदर्शशिक्षकपुरस्कार #ChangbhalaNews


0 टिप्पण्या