कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कृष्णा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र येत्या काळात इतर जिल्ह्यांमध्येही वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच ठाणे, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
आटके टप्पा (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यासपीठावर मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनावले, नगरसेवक हणमंतराव जाधव, शरद पवार, डॉ. स्वाती थोरात, कराडचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी पवार, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, बाजीराव निकम, निवासराव थोरात, अविनाश खरात, वसंतराव शिंदे, संजय पाटील, जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार, नव्या शाखांची उभारणी आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी चेअरमन आ.डॉ. भोसले म्हणाले, की ग्रामीण बँक म्हणून स्थापन झालेली कृष्णा बँक पुढील टप्प्यात अर्बन बँक आणि त्यानंतर शेड्युल बँक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, २०२७ पर्यंत शेड्युल दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या विस्तारामुळे पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य बँक म्हणून कृष्णा बँकेची ओळख अधिक बळकट होईल. बँकेने नेहमीच पारदर्शक व्यवहार केल्याने आज बँक प्रगतीपथावर आहे. सध्या बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे १३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मार्चअखेर तो निश्चितच १५०० कोटींचा टप्पा गाठेल.
बँकेच्या सभासदसंख्येत सातत्याने वाढ होत असून, यापूर्वी २४ हजार असलेली सभासद संख्या आता २६ हजारांवर पोहोचली आहे. सध्या बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या चार जिल्ह्यांपुरते मर्यादित आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर ठाणे, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले.
सभेच्या प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. संचालक शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, संतोष पाटील, नारायण शिंगाडे, सौ. सारिका पवार, सरिता निकम, विजय पाटील, अनिल बनसोडे, प्रदीप थोरात, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रमोद पाटील, प्रदीप पाटील, सुनील पाटील, गुणवंत जाधव, हेमंत पाटील, आप्पासो कदम आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवे सुसज्ज प्रधान कार्यालय लवकरच
कृष्णा बँकेचा कारभार दिवसेंदिवस विस्तारत असून, लवकरच नवे सुसज्ज प्रधान कार्यालय उभारण्याचा निर्णय या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी १ एकर जागेची खरेदी करून, त्याठिकाणी सुसज्ज इमारत, अद्ययावत डेटा सेंटर व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त प्रधान कार्यालय उभारले जाणार असल्याचे चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णासहकारीबँक
#KrishnaCooperativeBank
#AtulBhosale
#DrAtulBhosale
#KaradNews
#SataraNews
#CooperativeBanking
#BankExpansion
#MaharashtraBanking
#UrbanBank
#ScheduledBank2027
#FinancialGrowth
#WesternMaharashtra
#ChangbhalaNews


0 टिप्पण्या