कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर व स्वातंत्र्यसैनिक कै. शामराव पाटील अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे येथे दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी संयुक्त शेतकरी मेळावा व पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली.
शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील अण्णा यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त
‘ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित ऊस परिसंवाद’ या विषयावर शेतकरी व सभासद मेळावा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास बारामती कृषी विज्ञान केंद्राचे ऊस विशेषतज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
अध्यक्षस्थान अथणी शुगर लिमिटेडचे चेअरमन व माजी मंत्री श्रीमंत पाटील तात्या भूषविणार आहेत.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले व ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून
रयत सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
रविवार, दि. ४ जानेवारी रोजी माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून,
अध्यक्षस्थान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीनकाका पाटील भूषविणार आहेत.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिर, उंडाळे येथे होणार आहे.
सदर दोन्ही कार्यक्रमांना शेतकरी, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन
ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर व शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#उंडाळे #विलासकाका_पाटील_उंडाळकर
#शामरावपाटीलअण्णा #पुण्यतिथी_सोहळा
#शेतकरीमेळावा #ऊसपरिसंवाद
#AIतंत्रज्ञान #रयतसाखरकारखाना
#सहकारचळवळ #ChangbhalaNews

0 टिप्पण्या