🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड पोलीस यंत्रणा बळकट होणार? १२५ कोटींच्या पायाभूत सुविधांसाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कराडमधील कायदा व सुव्यवस्थेसाठी १२५ कोटींच्या निधीमागणीचे निवेदन देताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले.


कराड प्रतिनिधी : चांगभलं वृत्तसेवा

कराडमधील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने, विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एकूण १२५ कोटींच्या निधीची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सातारा येथे 'वृंदावन पोलीस टाउनशिप'च्या उदघाटनानिमित्त मुख्यमंत्री आले असता, आ.डॉ. भोसले यांनी हे निवेदन दिले.

कराडमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या आव्हानांचा विचार करता पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहर व तालुक्यात विविध ठिकाणी गरजेनुसार नवीन पोलीस चौकी उभारणे, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गार्डरूमची सुविधा निर्माण करणे, उपजिल्हा कारागृह (सबजेल) उभारणी, अत्याधुनिक शस्त्रागाराची व्यवस्था तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी एकूण १२५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा, सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवित, मुख्यमंत्र्यांनी कराडमधील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई व इतर मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KaradPolice #LawAndOrder
#AtulBhosale #DevendraFadnavis
#SataraNews #PoliceInfrastructure
#MaharashtraPolitics #BJP #KaradSouth
#PublicSafety #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या