आय.एम.ए.कडून सन्मान; भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'प्रोफेसर एमेरिटस' हा पुरस्कार कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. अहमदाबाद येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या १०० राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट, नि:स्वार्थ, सातत्यपूर्ण व प्रभावी योगदानाची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवर 'प्रोफेसर एमेरिटस' हा मानाचा पुरस्कार बहाल केला जातो. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता आणि नेतृत्व या क्षेत्रांत दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना देण्यात आला.
ओडिशा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मुकेश महालिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आर. व्ही. आसोकन, नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल नायक, सरचिटणीस डॉ. शरबरी दत्ता आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नीलम मिश्रा यांना यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्कार तसेच सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हा मानाचा सन्मान त्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाचे संस्थापक कुलपती, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित केला आहे.
या सन्मानामुळे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेचा आणि वैद्यकीय शिक्षणातील योगदानाचा गौरव अधिक दृढ झाला असून, या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी डॉ. नीलम मिश्रा यांचे अभिनंदन केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#DrNeelamMishra
#ProfessorEmeritus
#KrishnaVishwaVidyalaya
#IndianMedicalAssociation
#IMAIndia
#MedicalEducation
#MedicalLeadership
#IndianDoctors
#AcademicExcellence
#KrishnaUniversity
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या