🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

धर्मवीर आनंद दिघे यांची स्वप्नपूर्ती ; कराडला शिवसेनेचा नगराध्यक्ष; पक्षासाठी ऐतिहासिक क्षण

 


जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
"१९९४ साली धर्मवीर आनंद दिघे कराड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी कराड नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष व्हावा, असे स्वप्न व्यक्त केले होते. आज राजेंद्रसिंह यादव यांच्या रूपाने ते स्वप्न साकार झाले असून, हा क्षण पक्षासाठी ऐतिहासिक असा आहे " अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार (माऊली) यांनी दिली आहे.

कराड नगरपालिकेतील यशवंत व लोकशाही आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी काल, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष , माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी जयवंतराव शेलार बोलत होते.

दरम्यान, नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी यशवंत व लोकशाही आघाडीचे संयुक्त नगराध्यक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पक्ष आणि चिन्ह दोन्ही या निवडणुकीत बाजूला ठेवली गेली. तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सर्व धर्मीयांची मते खेचण्यासाठी शहरातील 'सर्व धर्मीयांना सुरक्षितता', आणि 'शांततामय सहजीवन' या प्रमुख दोन मुद्द्यांवर प्रचारात भर दिला होता. परिणामी, दलित आणि मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात यशवंत व लोकशाही आघाडीचे संयुक्त उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्या पारड्यात गेली अन् बहुसंख्य मुस्लिम मतदारांनी मुस्लिम उमेदवाराला नाकारले, दलित मतदारांनाही दलित पक्ष आणि त्यांच्या पाठिंबावरील उमेदवारांना स्वीकारलेच नाही, असे स्पष्टपणे निवडणूक निकालावरून समोर आले होते. तर या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे दुसरीकडे भाजपचेही 'हिंदू-मुस्लिम कार्ड' फेल झाले आणि राजकारणात धुरंदर समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अंमलात आणलेला 'धर्मनिरपेक्ष' फॉर्म्युला यशस्वी ठरला. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनीही राजेंद्रसिंह यादव यांना पाठिंबा जाहीर करताना, जाहीर पत्रकार परिषदेमध्ये "आम्ही 'शाहू फुले आंबेडकर' ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे" असे जाहीर केले होते. ही पार्श्वभूमी पाहता हिंदुत्ववादी पक्ष आणि विचारधारा असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी 'कराडचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच' असे जाहीरपणे विधान करून कराडच्या राजकारणात काहीशी खळबळ उडवून दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #KaradNews #Karadkar #KaradCity
#KaradPolitics #कराडराजकारण #कराडनगरपालिका
#बाळासाहेबपाटील #राजेंद्रसिंहयादव #यशवंतआघाडी
#लोकशाहीआघाडी #BjPVsShivsena #BJPVSNCPSP
#KaradNagarPalika #MaharashtraPolitics
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या