🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कृष्णा विश्व विद्यापीठात गुरुवारपासून ‘जेम्स २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

 

कृष्णा विश्व विद्यापीठ कराड येथे आयोजित JEMS 2026 ग्लोबल इमर्जन्सी मेडिसिन समिट आंतरराष्ट्रीय परिषदेमधील उद्घाटन सोहळा

‘इमर्जन्सी मेडिसीन’वर होणार व्यापक चर्चा; ६ देशांतील तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि अकॅडेमिक इमर्जन्सी मेडिसीन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथे ८ ते ११ जानेवारी या कालावधीत ‘जेम्स २०२६’ अर्थात ग्लोबल इमर्जन्सी मेडिसिन समिट या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत इमर्जन्सी मेडिसीन या विषयातील ११ आंतरराष्ट्रीय आणि ४३ राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

आपत्कालीन वैद्यक क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि जागतिक अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली ही महाराष्ट्रातील पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद आहे. परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन शनिवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी ऑस्ट्रेलियातील प्रा. डॉ. अन्थोनी ब्रॉवन, दक्षिण अफ्रिकेतील प्रा. डॉ. तोमोथ्य हार्डकॅस्टल, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश डेव्हिड, कृष्णा हॉस्पिटलमधील इमर्जन्सी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. शंतनु कुलकर्णी, डॉ. राहुल एस. एस., डॉ. अभिनव टी., डॉ. मारिओ ॲन्टोनी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. यादिवशी कृष्णा विद्यापीठातील ॲनोटॉमी विभागातर्फे क्ले मॉडेलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या चार दिवसीय परिषदेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इस्रायल, नेपाळ, युनायटेड अरब एमिराट्स, युनायटेड किंग्डम आदी देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांमधील नामवंत आपत्कालीन वैद्यक तज्ज्ञ उपस्थित राहून कार्यशाळा, शैक्षणिक सत्रे व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KrishnaVishwaVidyalaya
#JEMS2026
#GlobalEmergencyMedicineSummit
#EmergencyMedicine
#InternationalMedicalConference
#KaradNews
#SataraNews
#MedicalEducation
#HealthcareConference
#EmergencyCare
#MedicalExperts
#KrishnaHospital
#KIMSKarad
#MedicalResearch
#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या