कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
म्हासोली - पाटीलवाडी (ता. कराड) येथील रहिवासी सौ. मीना प्रताप कदम (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटीलवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौ. मीना कदम या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. त्या कराड येथील संत तुकाराम हायस्कूलमधील शिक्षक श्री. हेमंत कदम आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. मनोहर कदम यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आणि या दुःखातून सावरण्यासाठी कदम परिवाराला बळ मिळो, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सौ. मीना कदम यांचा रक्षा विसर्जन विधी शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी म्हासोली - पाटीलवाडी येथे होणार असल्याचे कुटुंबाकडून कळविण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या