🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

५० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; नांदगाव येथे दक्षिण मांड नदीवर नवा पूल उभारणीस मंजुरी ; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

 


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


कराड दक्षिण मतदारसंघातील नांदगाव (ता. कराड) येथे दक्षिण मांड नदीवरील सुमारे ५० वर्षे जुन्या पुलाच्या जागी नव्या मोठ्या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नांदगाव येथील दक्षिण मांड नदीवर सन १९७६ साली कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून, थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) व सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुढाकारातून सध्याचा पूल उभारण्यात आला आहे. त्याकाळी या पुलामुळे नांदगावसह परिसरातील अनेक गावांची वाहतूक सुलभ झाली व ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली. आजदेखील याच पुलावरुन वाहतूक सुरु आहे.

पण हा पूल आता जीर्ण झाला आहे. कारखान्याच्या माध्यमातून हा पूल उभारला गेल्याने, पुढील काळात त्याच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासनाकडून नियमित निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी जीर्ण झालेले दगडी पद्धतीचे जुने बांधकाम, कमी रुंदी व उंची यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. बऱ्याचदा या पुलावर दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागते. यातच दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने पुढाकार घेत, नवीन लोखंडी रेलिंग बसवण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली. त्याचबरोबर याठिकाणी कायमस्वरूपी आणि मजबूत असा नवीन मोठा पूल उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. अतुलबाबा भोसले यांनी याठिकाणी नवीन पुलाच्या उभारणीचे महत्त्व शासनाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे त्यांनी सातत्याने याबाबत मागणी केली. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नांदगाव येथे नवीन पूल उभारणीसाठी नाबार्ड योजनेतून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नवीन पुलाच्या उभारणीमुळे नांदगाव परिसरातील ग्रामीण दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. हा मार्ग जिल्हा जोडमार्ग असल्याने, पूल पूर्ण झाल्यानंतर शिराळा, कालवडे–बेलवडे मार्गे राष्ट्रीय महामार्ग तसेच जिंतीकडे जाणारी वाहतूक अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे. ज्याचा लाभ शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल नांदगाव व परिसरातील ग्रामस्थांनी महायुती सरकारचे तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.



नवा पूल ठरणार विकासाचा साक्षीदार....

ज्याठिकाणी पूर्वी आजोबा यशवंतराव मोहिते (भाऊ) आणि जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रयत्नातून पूल उभारण्यात आला होता, त्याच जागी आता ५० वर्षानंतर त्यांचे नातू आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून ७ कोटींच्या निधीतून नवा व भव्य पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे हा पूल केवळ दळणवळणाचा मार्ग न राहता, पिढ्यान्‌पिढ्यांच्या विकासाचा साक्षीदार ठरणार आहे.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#नांदगाव #कराडदक्षिण #नांदगावपूल
#दक्षिणमांडनदी #NABARDयोजना
#७कोटीनिधी #AtulBhosale #डॉअतुलबाबाभोसले
#ShivendrasinhrajeBhosale #महायुतीसरकार
#सार्वजनिकबांधकामविभाग #ग्रामीणदळणवळण
#कराडबातमी #साताऱ्याच्या बातम्या
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या