🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

यशाच्या शिखरावर पोहोचूनही शाळेप्रती ऋण व्यक्त; कुशल मोहितेचे सहकार्याचे आश्वासन

 

आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कुशल मोहिते ब्रह्मदास विद्यालय बेलवडे बुद्रुक येथे आयोजित सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेला क्रीडापटू कुशल कुमार मोहिते याचा नुकताच विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कुशल मोहितेने आपण ज्या शाळेने घडवले त्या ब्रह्मदास विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यात शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात रौप्य पदक पटकावलेल्या कुशलने आपल्या यशामागे विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व शिस्त यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. “आज मी ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शाळेचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी मी सदैव उपलब्ध राहीन,” असे कुशल मोहितेने सांगितले.


या कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक जे. बी. माने म्हणाले, “कुशल मोहितेने मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण ब्रह्मदास विद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. त्याची मेहनत, चिकाटी व शिस्त ही विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे. कुशलसारखे विद्यार्थी शाळेचे खरे भूषण असून, त्याच्या सहकार्यामुळे विद्यालयातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुशल मोहितेच्या या कृतज्ञतेतून व्यक्त झालेल्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद व प्रेरणा निर्माण झाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कुशलमोहिते #KushalMohite
#InternationalAthlete #DecathlonSilverMedalist
#BrahmdasVidyalaya #BelwadeBudruk
#KaradTaluka #SataraDistrict
#SchoolPride #AthleticsChampion
#StudentAchievement #MarathiSportsNews
#ChangbhalaNews #शाळेचा_अभिमान
#क्रीडापटू #विद्यार्थी_यश #कराड #सातारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या