🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘कृष्णा’मध्ये सोमवारपासून ‘बायोमेक इन इंडिया-३’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

 

कृष्णा अभिमत विश्व विद्यापीठ कराड

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर आधारित ‘बायोमेक इन इंडिया–३’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ ते २१ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार असून, यामध्ये देश-विदेशातील मान्यवर शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत शाश्वत नवोपक्रम आणि मानवी कल्याणासाठी भारतीय ज्ञानप्रणाली आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. आतापर्यंत सुमारे ७०० हून अधिक प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

भारतीय ज्ञान परंपरेतील विविध पैलू, प्राचीन भारतीय ग्रंथांमधील भौतिक व पृथ्वी विज्ञानाची तत्त्वे व त्यांचे आधुनिक काळातील महत्त्व, जीव विज्ञान, कृषी व पारंपरिक तंत्रज्ञान, आयुर्वेद, योग आणि पारंपरिक कृषी पद्धतींचे आधुनिक विज्ञानाशी एकत्रीकरण, तसेच तंत्रज्ञान, प्रशासन आणि शाश्वत विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणालीची समकालीन उपयुक्तता या विषयांवर परिषदेत सहभागी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भित्तीपत्रिका सादरीकरण, प्रतिकृती प्रदर्शन, शोधपत्रिका सादरीकरण असे विविध शास्त्रीय उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या परिषदेसाठी अमेरिका, आफ्रिका, नेपाळ, इटली, मलेशिया, जर्मनी, दक्षिण कोरिया आदी देशांतील तज्ज्ञांनी वक्ते म्हणून नोंदणी केली आहे.

१९ जानेवारी रोजी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार असून, याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दासगुप्ता आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे यांनी दिली.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #KrishnaUniversityKarad

#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या