🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराड दक्षिणच्या विकासाला गती; कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून ५२ गावांसाठी ६.५० कोटींचा निधी मंजूर ; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधी अंतर्गत कराड दक्षिणमधील विकासकामांना मंजुरी

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कराड दक्षिणमधील तब्बल ५२ गावांमधील विविध विकासकामांसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, ६.५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत हा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतील ५० टक्के रक्कमेचा धनादेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला असून, लवकरच या विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे.

कोयना भूकंपप्रवण क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ५२ विविध विकासकामांना एकूण ६ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे या समितीचे विश्वस्त असून, त्यांनी सूचित केलेल्या ५२ गावांमध्ये रस्ते सुधारणा, स्मशानभूमी संरक्षण भिंती, मंदिर परिसर विकास, शाळा खोल्या, समाजमंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा व अंतर्गत रस्ते अशा बहुविध स्वरूपाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये शेरे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), आटके येथील भैरवनाथ मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख), रेठरे बुद्रुक पवार मळी येथे स्मशानभूमीस घाट बांधणे (२० लाख), रेठरे खुर्द येथील महादेव मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख), कापील येथे पाचवड वस्ती - सावंत मळा – पाळसकर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लाख), कोडोली येथील आरोग्य उपकेंद्रास संरक्षण भिंत बांधणे (२० लाख), गोळेश्वर येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९७ लाख), दुशेरे येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे (१० लाख), बेलवडे बुद्रुक येथे धनगर समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख), वाठार येथील जिल्हा परिषद शाळेत सभागृह बांधणे (२० लाख), काले येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९६ लाख), नांदगाव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), कुसुर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), पोतले येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), वनवासमाची येथील पाटील वस्तीमध्ये ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), चचेगाव येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), गोटे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.८२ लाख), कोयना वसाहतीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), धोंडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), चौगुले मळा येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षित भिंत बांधणे (१० लाख), सवादे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), साळशिरंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन खोली बांधणे (१४.९९ लाख), म्हासोली येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), सैदापूर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), वहागाव येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१४.९७ लाख), शेणोली येथील ओढ्यावर संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), संजयनगर (शेरे) येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जुळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नवीन खोली बांधकाम करणे (१५ लाख), खुबी येथील सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे (२५ लाख), गोंदी येथील नवीन गावठाण येथे बंदीस्त गटर करणे (१५ लाख), कार्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली बांधणे (१५ लाख), कासारशिरंबे येथील तालिमच्यावर नवीन व्यायामशाळा बांधणे (१० लाख), ओंड येथील निनाई ओढ्यावर निनाई मंदिरानजीक साकव पूल बांधणे (४८.३० लाख), किरपे येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), कोळे येथील दत्त मंदिर ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), येरवळे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), विंग येथे खंडोबा मंदिर परिसर संरक्षक भिंत बांधणे (१४.९९ लाख), वारुंजी येथील सतीआई मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), ओंडोशी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), मनव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), येणपे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), तुळसण येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९७ लाख), खोडशी येथे महादेव मंदिर परिसर संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), टाळगाव येथील ग्रामपंचायत सभागृह बांधणे (१० लाख), मालखेड येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (१५ लाख), लटकेवाडी रस्ते सुधारणा (५ लाख), शेवाळवाडी पाटीलवाडी (म्हासोली) येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), येणके येथील वांग नदी ते जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख), नारायणवाडी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९० लाख), येवती येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जिंती येथे नवीन व्यायाम शाळा इमारत बांधणे (१० लाख), गोटेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारणा करणे (१५ लाख) अशी विकासकामे केली जाणार आहेत.

कोयना भूकंपप्रवण क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हा निधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, सार्वजनिक सुविधा व सामाजिक सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहेत. विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्ते व संरक्षण भिंतींच्या कामांना यामुळे गती मिळणार आहे.

या निधी मंजुरीमुळे कराड दक्षिणमधील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून, निधी मंजुरीबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे व भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#कराडदक्षिण #AtulBabaBhosale
#DevendraFadnavis #KoynaEarthquakeFund
#कोयना_भूकंप_पुनर्वसन #विकासकामांना_मंजुरी
#KaradSouthDevelopment #BJP_Mahayuti
#SataraNews #KaradNews #RuralDevelopment
#InfrastructureDevelopment #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या