🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

शासकीय चित्रकला परीक्षेत ब्रह्मदास विद्यालयाचे दैदीप्यमान यश; शंभर टक्के निकाल

शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल मिळविल्याबद्दल कला विभाग प्रमुख वहिदा अत्तार यांचा सत्कार करताना ब्रह्मदास विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा

कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक या शाळेने शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेचा शंभर टक्के निकाल लावला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या यशामुळे तालुक्यातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.


इंटरमिजिएट परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये १ विद्यार्थ्याने ‘A’ ग्रेड, १४ विद्यार्थ्यांनी ‘B’ ग्रेड तर ३० विद्यार्थ्यांनी ‘C’ ग्रेड प्राप्त करून उत्तम यश मिळवले. तसेच एलिमेंटरी परीक्षेसाठी ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये ३ विद्यार्थ्यांनी ‘A’ ग्रेड, ११ विद्यार्थ्यांनी ‘B’ ग्रेड आणि ३३ विद्यार्थ्यांनी ‘C’ ग्रेड मिळवत शाळेच्या यशात भर घातली.


या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांचे मार्गदर्शन, तसेच कला विभाग प्रमुख वहिदा रफिक अत्तार व ज्येष्ठ शिक्षिका यांचे विशेष परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या नियमित सरावासोबतच सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे बी माने यांनी व्यक्त केले.


या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पुढील काळातही शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#BrahmdasVidyalaya
#BrahmdasSchoolBelwade
#GovernmentDrawingExam
#ShaskiyaChitrakalaPariksha
#100PercentResult
#ArtEducation
#SchoolAchievement
#KaradEducation
#SataraEducation
#BelwadeBudruk
#KasegaonShikshanSanstha
#StudentSuccess
#CreativeEducation
#ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या