हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या शुक्रवारी पार पडलेल्या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पक्षाचे शहरातील धडाडीचे कार्यकर्ते सुहास जगताप यांची नगरसेवक पदी नियुक्ती झाली आहे. जगताप यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करून कराड शहरात भाजपकडून निष्ठावंताला संधी देत पक्ष बळकटीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सुहास जगताप हे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे खंदे समर्थक आणि कराड शहरातील पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कराड शहरात भाजपच्या पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. प्रभावी संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्यांच्या प्रभागासह शहरात भाजपचे पक्ष संघटना वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत मोठे योगदान दिले आहे. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. त्यांच्या कामाचा वेगळा ठसा कराड शहरातील नागरिकांच्या मनात कायम आहे. याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिली, आणि कराड नगर परिषदेवर भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली. ही सर्वसामान्य आणि तळमळीच्या कार्यकर्त्याची निवड असल्याची प्रतिक्रिया पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि शहरातील नागरिकांच्या मधून व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते नूतन नगरसेवक सुहास जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे उपस्थित होत्या. या सत्कारावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नूतन नगरसेवक सुहास जगताप यांचे खास अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
"जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहू" - जगताप
"भाजपच्या माध्यमातून आपण आजवर शहरात काम करत आलो आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण नेहमीच प्राधान्याने पार पाडली. शहरातील नागरिकांच्या हितासाठी आजवर तळमळीने प्रयत्न केले आहेत. या आपल्या कामाची आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्षाने आपल्याला नगरसेवक पदी संधी दिली आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहून या संधीचे आपण निश्चित सोने करून दाखवणार आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तसेच पक्ष संघटनेने आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू. नगरसेवक म्हणून काम करताना सामूहिक जबाबदारीचे भान कायम ठेवून पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या बरोबर शहराच्या विकासात्मक वाटचालीत निश्चितपणे आपले सर्वोच्च योगदान देऊ, " अशी प्रतिक्रिया निवडीनंतर 'चांगभलं न्यूज' सोबत बोलताना नूतन नगरसेवक सुहास जगताप यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #KaradNews #कराडनगरपरिषद
#भाजप #BJP #SuhasJagtap
#स्वीकृतनगरसेवक #AtulBhosale
#KaradPolitics #SataraDistrict
#ChangbhalaNews #राजकारण
#स्थानिकबातम्या #BJPKarad

0 टिप्पण्या