🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

शासकीय तपासणीत जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक; शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ

धावरवाडी येथे जयवंत शुगर्स कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची शासकीय भरारी पथक व शेतकरी संघटनांकडून तपासणी करतानाचे दृश्य


कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा


धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्या वजनकाट्याची जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.

सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश दिले आहेत. यानुसार वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, लेखा परीक्षक डी. ए. जाधव, उप लेखापरीक्षक एस. एस. जंगम, आकाश कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कोळी, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिपक पाटील, अनिरुध्द होवाळ यांनी संयुक्तपणे जयवंत शुगर्स कारखान्याला अचानक भेट देऊन कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी केली.

ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे दिसून आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर अरुण खटके आदी उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#JaywantSugars #ऊसवजनकाटा #WeighbridgeCheck #SugarFactoryNews #KaradNews #SataraNews #शेतकरीहित #FarmerTrust #GovernmentInspection #WeighbridgeAccuracy #ChangbhalaNews #SugarSeason #ऊसहंगाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या